असा समजू नका की हा लेख माझ्या प्रियसी साठी वगेरे आहे म्हणून, तिचा पेक्षा कुणी खूप महत्वचा आपलया आयुष्यात आहे ,ते म्हणजे आपले आई वडील….
आपल्या पैकी बरेच जन त्यांना ओझ मानतात, तुम्ही हो म्हणून उत्तर मुळीच देणार नाही हे माला ठाऊक आहे.पण हे सत्य आहे. आपल्या इथे वृद्धाश्रमात रोज कुणी न कुनि म्हातारा किवा म्हातारी भरती व्हायाला येत, किवा कुणाचा मुलगा त्यांना सोडायला येतो. ही दृश फार मनाला बोचणारी असतात. याचा पेक्षा वाईट तर हे आहे की, काही मुलं असा देखील आहेत की आपल्या आई वडीलांना सोडून देतात. ती म्हातारी पावले खरच अस काही भोगतिल असा त्यांनी कधीच विचार केला नसतो. …!!!!
त्यांचा मुलांसाठी थोडा लिहन्याचा प्रयत्न मी केलं आहे, नक्की वाचा …….
बाप काढलास घराबाहेर ,
घरात रडते आई ,
पण बायकोला मात्र रोज म्हणतोस तूझ्यासाठी काही…!
जरा तुझ्या आईचे आठवून बघ दिवस,
लेका तु भेटावा म्हणून तिने किती केले होते नवस,
नवस करून देव सुधा पावला,
तुझ्या सारखा हिरा तिला दावला,
लहानपणी आई तुला शेतात न्यायची,
तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली तुला द्यायची .
तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास
अन आईचा दूध जरी संपल तरी तिचा रक्त ओढायचास,
रक्त पीऊन पोसल लेका ,
त्या रक्ताचा तरी ठेव मान,
पवित्र अश्या आईचा करू नको अपमान,
आता फक्त एक कर,
त्या दारातल्या आईला घरात आन,
किती दिवस जगनार आहे लेका,
झाडावरचा पिकला पान?,
तू गोड धोड खा,
पण म्हातार्या आईला शिळी भाकर तरी वाड,
अन भाकर वाडायाला जर तुझी बाईको मदी आली न,
तर तीला घरआ बाहेर काढ….!!!!
कारण, नवरा माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जायची कुण्याच बाईत नसते हिम्मत.!!!
तुला वाघ बनवला आईना, पण दुर्दैवान
तिलाच उरला नाही बाईपण,
खरा मर्द असशील तर तीच दर्शन घेऊ म्हण ,
आई तुझ्यासाठी काही पण तुझ्या साथी काही
पण….!!!
आरे देवा सरखा बाप तुझा तोही सोडला वार्यावर
तुझ्या पोटाची भूक मिटविण्यासाठी तो फाटक्या धोतराणी जायचा शेतावर,
तूझ्या शिक्षनासाठी त्यांनी किती कर्ज घेतला होत,
तूल नौकरी लगली तेव्हा तुझा बापान गाव भर वाटली होती साखर,
पण आज दुर्दैवणी त्याचाच ताटात नाही भाकर, ….!!!
आज आपण महासत्ता बनन्याचे स्वप्न पाहोतो आहे, चंद्रपर्यन्त
उंच भरारी मारल्यात , पण कटू सत्य हे आहे की ,जितके आपणा उंच गेलो आहोत तितकेच खाली देखिल आलो आहोत.
जर सुंदर मुलगी बाजूला उभी असेल तर तिला
आपण किती संस्कारी आहोत हे दाखवण्यासाठी रस्त्यावर उभी असलेल्या गाई ला नमस्कार करतो, मिटरकही आई दिसली की त्यांना नमस्कार करतो , आदर करतो,पण तीच वागणूक आम्ही आपल्या आई ला देतो ?
या प्रश्ना सोबत सोडून जातो आहे मित्रांनो…पण नक्की विचार करा…!!!

Aap bohoot accha likhte ho sir 👍
LikeLiked by 1 person
Thanks Ma’am.
LikeLike